पाय घसरल्याने पाण्यात पडल्याने तलावात बुडून एका 19 वर्षीय तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हर्सूल तलावात घडली.
प्रदूम ईश्वर वरकड वय-19 (रा.सारावैभव सोसायटी,जटवाडा रोड) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की,मृत प्रदूम हा हर्सूल तलाव परिसरात फिरायला गेला होता. माध्यरात्री 10 वाजेच्या सुमारास तो तलावात पडला.ही घटना परिसरातील नागरिकांनी पहिली.व अग्निशामनदलाला पाचारण करण्यात आले.तातडीने अग्निशमन अधिकारी आर के सुरे, हरिभाऊ घुगे,शिवसभा कल्याणकर, संजय शिंदे सह आदीच्या पथकाने धाव घेत तरुणाला पाण्यातून बाहेर काढले मात्र तो पर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले करीत आहेत.